Wednesday, February 15, 2012

Ek premal sandhyakaal

सगळीकडे प्रेम बहरलंय,
सगळीकडेच एक आतुर घालमेल,
सगळीकडे भेटीची ओढ,
दोन जीवांचा सगळा खेळ.

कुणी वेळ वाचवतंय फास्ट ट्रेन पकडून,
कुणी धक्के खातंय बसला लटकून,
कुणी कोसतंय सिग्नलच्या  लाल दिव्यांना,
तर कुणी थकलंय त्याची वाट पाहून.

कुठल्या तरी कोपऱ्यात कुणी घट्ट मिठीत लपलंय,
कुठे फुलांच्या गुलदस्त्यापाठी गुलाबी होऊन लाजलय,
कुठे कुणी पाहील म्हणून गर्दीत थोडं बावरलंय,
तर कुठे कुणी गर्दीतही एकमेकांमध्ये हरवलंय.

सगळीकडे प्रेम बहरलंय,
संध्याकाळीही धुकं दाटलय,
गुलाबी थंडीत गुलाबी होऊन,
क्षितिजापर्यंत पसरलंय.

0 Write your comment: